नंदुरबार। येथील अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे प्रथमच 25 मार्च रोजी राजस्थान येथील अग्रवाल समाजाचा प्रसिद्ध गणगौर मेळावा घेण्यात आला. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून लायनेस गव्हर्नर डॉ.तेजल चौधरी हे होत्या. होळीच्या दुसर्या दिवसापासून ते सोळाव्या दिवसापर्यंत अग्रवाल समाजातील सौभाग्यवती महिला व युवती गणगौरची पुजा व आराधना करतात. विवाहित महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तर युवती आयुष्यात आपल्याला अनुकूल वर मिळावा यासाठी गणगौरची आराधना करतात.
विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन
मेळाव्यात विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यात राजस्थानी पारंपारिक नृत्य, इशरजी-गणगौरची वेशभुषा, गेम्स, राजस्थानी जीवन शैलीवर आधारीत समाजोपयोगी उपक्रम (कथा-कथन) आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास संबोधितांना नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी म्हणाल्या, की गणगौण मेळाव्या आल्यानंतर मला राजस्थानात आल्यासारखे वाटत आहे. भव्य-दिव्या मेळाव्याच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुकही नगराध्यक्षा यांनी केले. मेळाव्यास प्रसिद्ध भगवतकार 1008 श्री स्वामी इंद्र देवेंद्रानंद सरस्वती महाराज यांचा आशिर्वाद लाभला. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा रमा अग्रवाल, सचिव साधना अग्रवाल तसेच कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.