उत्तर प्रदेशातील कासगंज येथे तिरंगा हातात घेऊन फेरी काढणार्या चंदन गुप्ता यांच्यावर प्रजासत्ताकदिनीच धर्मांधांच्या आक्रमणात जीव गमावण्याची वेळ आली. पूर्वीपासूनच केरळ, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आदी राज्यांसह कमीअधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या वेचून वेचून हत्या केल्या जात आहेत. देशात हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षाचे सरकार आल्यानंतर हे हत्यासत्र थांबेल आणि हिंदुत्वद्वेष्ट्यांना वचक बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कासगंज येथील प्रकरणाने हिंदूंचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला.
भारतमातेचा जयजयकार करणे गुन्हा आहे का?
चंदन गुप्ता यांच्यावर नेम धरून गोळी झाडल्यानंतर प्रकरण थांबले नाही, तर चंदन यांचे वडील सुशील गुप्ता यांनाही पुढील चारच दिवसांत धर्मांधांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली. ‘याप्रकरणी मुख्य आरोपी (सलीम आणि वसीम) कारागृहात असले, तरी बाकीचे बाहेर आहेत. आमच्याशी दुश्मनी घेऊ नका. आम्ही तुम्हाला बघून घेऊ’ अशी धमकी मिळाल्यानंतर गुप्ता यांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्याची सरकारकडे मागणी केली आहे. ‘भारतमातेचा जयजयकार करणे गुन्हा आहे का?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे सरकारकडे काय उत्तर आहे ?
सरकार हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी
कृतीप्रवण होणार का?
गेल्याच आठवड्यात कन्नूर (केरळ) येथे अभाविपचे शाम प्रसाद यांची धर्मांधांनी धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या केली. बंगळुरू येथे भाजयुमोचे संतोष, अनधिकृत मशिदीचे काम बंद पाडणारे कल्याण येथील विश्व हिंदू परिषदेचे शाखा संयोजक अशोक मालुसरे यांचाही याच आठवड्यात धर्मांधांच्या आक्रमणात जीव गमावलेल्यांमध्ये नाव आहे. एवढे होऊनही ‘पुरस्कार वापसी’ टोळीने या हत्यांविरोधात चकार शब्द काढला नाही. यातूनच पुरो(अधो)गामी म्हणवणार्यांचा हिंदुत्वाविषयीचा आकस दिसून येतो. हिंदुत्वनिष्ठांच्या अशा किती हत्या झाल्यानंतर सरकार विकासाच्या स्वप्नातून बाहेर येऊन हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी कृतीप्रवण होणार आहे?
हिंदू सुरक्षित नाहीत!
जिथे हिंदूबहुल भारतातील हिंदूच सुरक्षित नाही, तेथे विदेशातील हिंदूंची काय कथा! खरे तर जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदूबहुल राष्ट्र म्हणून सरकारने देशासह जगभरातील हिंदूंचे भारत हे हक्काचे आश्रयस्थान होईल, असे वातावरण निर्माण करायला हवे होते. तसे होणे दूरच, उलट भारतातूनच धर्मांधांच्या भयाने हिंदूंना पलायन करावे लागत आहेत. स्वतंत्र भारतात जवळपास प्रत्येक शहरात मिनी पाकिस्तान म्हणून ओळखले जाणारे संवेदनशील प्रदेश आणि राष्ट्रविरोधी कारवायांची केंद्रे निर्माण झाली आहेत. जिहादी आतंकवादात होरपळून 28 वर्षे उलटली, तरी काश्मिरी हिंदूंना त्यांच्या जन्मभूमीत सुरक्षित वास्तव्य करता येण्यासाठी झगडावे लागत आहे, तर दुसरीकडे म्यानमारमधील हिंसक रोहिंग्यांना जम्मूमध्ये पायघड्या अंथरल्या जात आहेत. काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करणार्या देशद्रोह्यांवर गोळीबार केला म्हणून सैनिकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जात आहे, तर दुसरीकडे सैनिकांवर दगडफेक करणार्या देशद्रोह्यांवरील खटले मागे घेतले जात आहेत. जेेेथे सैन्य असुरक्षित आहे तेेेथे सामान्य नागरिक कसे सुरक्षित असतील!
असुरक्षित विकास काय कामाचा?
गेल्या 4 वर्षांत हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होऊन केंद्रात, तसेच अनेक राज्यांत भाजपचे सरकार स्थापन झाले. मात्र, ज्या उद्देशाने हिंदूंनी मतदान केले, तो उद्देशच सरकारने खड्यासारखा बाजूला केला आहे की काय असे वाटावे, अशी परिस्थिती आहे.हिंदूंनी विकासासाठी नाही, तर सुरक्षेसाठी आणि हिंदुत्व बुलंद करण्यासाठी भाजपला सत्ता दिली. मात्र, ते सोडून सरकार केवळ विकासाच्या स्वप्नात रमले आहे. हिंदुत्वविरहित आणि सुरक्षाविरहित विकास काय उपयोगाचा? सरकार बांधत असलेले विकासाचे इमले तेव्हाच सुरक्षित राहतील जेव्हा देश सुरक्षित असेल. देशाची आणि देशवासीयांची सुरक्षा हेच कोणत्याही राजाचे आद्यकर्तव्य आहे. मात्र, त्याची जाणीव न ठेवता कारभार केला, तर देशात अनागोंदीसदृश चित्र दिसणारच.
चंदन गुप्ता प्रकरणानंतर उत्तर प्रदेशात काही जणांशी माझी जी चर्चा झाली, त्यातून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे हिंदू समाजात प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. कोणताही राजकीय पक्ष हिंदू समाजाच्या सुरक्षिततेचा वाली राहिलेला नाही. ही भाजपसाठीही धोक्याची घटना आहे. सरकारने वेळीच स्वतःचे दायित्व ओळखून ‘अच्छे दिन’च्या आधी जनतेला ‘सुरक्षित दिन’ अनुभवायला द्यावेत. तोपर्यंत हिंदूंनी स्वतःच सक्षम होणे आणि संघटित होणे अपरिहार्य आहे.
– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387