लाखोंच्या ऐवजावर डल्ला ; ग्रामस्थांमध्ये पसरली भीती
रावेर- तालुक्यातील अजंदा व नांदूरखेडा गावात शुक्रवारी रात्री दोन घरफोड्या करीत चोरट्यांनी 90 हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख 25 हजार 400 रुपयांच्या डल्ला मारल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. रावेर तालुक्यातील अजंदा येथील टिळक रूपा बिरपन हे आपल्या राहत्या घराच्या ओट्यावर पंखा लावून झोपले असतांना शुक्रवारी रात्री चोरट्यांनी लोखंडी कपाट व लोखंडी शोकेस फोडून त्यातील 90 हजार रोख 25 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 25 हजार किंमतीचे 10 ग्रामचे सोन्याचे लॉकेट, 25 हजार रुपये किंमतीची मणी पोत, 2 ग्रॅमच्या पादुका, सात हजार 500 रुपये किंमतीचे टॉप्स तसेच तीन ग्रॅमचे मुलांचे दागिने व 500 रुपयांचा चायना मोबाईल मिळून एक लाख 75 हजार 400 रुपयांच्या ऐवज लांबवून पोबारा केला.
नांदूरखेड्यातही चोरीने खळबळ
जवळच असलेल्या नांदूरखेडा गावातील चिंधाबाई लक्ष्मण पाटील या घराबाहरेर झोपले असताना त्यांच्या गळ्यातील 25 हजार किंमतीची सोन्याची पोत तसेच त्यांचे जेठाणीच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीची पोत लांबवत चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, ग्रामीण भागात गुरे चोरीसह दुकान फोडण्याचे सत्र सुरू असून पोलिसांची गस्त भेदून चोरटे पलायन करण्यात यशस्वी ठरत आहे. याा प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.