अजंदे बु. आरोग्य उपकेंद्राला गौरव पुरस्कार

0

होळनांथे। धुळे जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य विभाग प्रथम महिला डॉ. आनंदीबाई जोशी स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा गौरव पुरस्कार अजंदे बु. ता.शिरपूर येथील आरोग्य उपकेंद्राला मिळाला. सदर निवडीबद्दल उपकेंद्रातील कर्मचार्यांचे अजंदे बु. ग्रामपंचायतर्फे अभिनंदन करण्यात आले. सर्वोत्कृष्ट आरोग्य संस्थेचा सन 2016-17 चा जिल्ह्यात प्रथम पुरस्कार अजंदे बु ॥ उपकेंद्राला प्राप्त झाला.

आरोग्य सेवेच्या माध्यमातून आपल्या हातातून सत्कार्य व्हावे
होळनांथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाने उपकेंद्रातील आरोग्यसेविका आर.बी.लोखंडे, स्मिता सोनवणे यांचे खरोखरच प्रेरणादायी कार्य असून त्यांना रत्ना शिंदे, वंदना पाटील, हिराबाई मराठे यांचे नेहमी सहकार्य मिळत असल्याचे अजंदे बु. चे सरपंच चंद्रकांत ाटील यांनी सांगितले. आरोग्य सेवेच्या माध्यमातून आपल्या हातातून सतत रूग्णसेवा घडो, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी उपसरंपच तुळशिराम मराठे, ग्रा.पं.सदस्य जाकीर खाटीक, सचिन राजपूत, छोटू मराठे, ज्योतीबाई सोमवंशी, लताबाई पाटील, शहनाजबी खाटीक, जोगेश्‍वरी संस्थेचे सचिव योगेश पाटील, छनू भिल, महेंद्र मिस्तरी, महेंद्र पाटील आदींची उपस्थित होती.