रावेर । नुसता साप म्हटला म्हणजे एरवी चांगल्या-चांगल्याची भंबेरी उडते मात्र प्रत्यक्षात भल्या मोठ्या आकाराचा अजगरच चक्क वसाहतीत एका हॉटेलात शिरल्याने चांगलाच थरकाप उडाला, मात्र लागलीस सर्पमित्रास पाचारण करण्यात येऊन तातडीने त्यास पकडत वनविभागाच्या ताब्यात देत सतर्कता दाखवली. शहरातील कौशल नगर भागातील बबलूशेठ नगरिया यांच्या हॉटेलमध्ये रविवार, 13 रोजी सकाळी कारागीराला काऊंटरखाली अजगराचे दर्शन घडताच त्याची भंबेरी उडाली. सर्पमित्राने अजगराला अलगद पकडत वनविभागाचे वनक्षेत्रपाल आर.जी. राणे व त्यांच्या सहकार्यांकडे सुपूर्द केले. त्यामुळे हॉटेल मालकाने सुटकेचा निश्वास सोडला.