मुंबई । मुंबई जिल्हा कॅरम संघटना आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने माटुंगा वेल़्फ्रेअर हॉल येथे सुरू असलेल्या 7 व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या तिसर्या फेरीत ए के फाउंडेशनच्या अजगर शेखने धक्कादायक विजय नोंदवला. अजगरने अटीतटीच्या लढतीत माजी सार्क व आशियाई विजेत्या रिझर्व्ह बँकेच्या हिदायत अन्सारीला 11-25,25-16,18-12, असा गाशा गुंडाळायला लावला.
स्पर्धेतील निकाल :
पुरुष एकेरी (तिसरी फेरी) राहुल चिपळूणकर (महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ) विजयी विरुद्ध धीरज गायकवाड (एस एस ग्रुप) 24-17, 25-13. योगेश धोंगडे (जैन इरिगेशन) विजयी विरुद्ध दीपक मारू (एस एस ग्रुप) 25-14, 14-8. कमलेश राठोड (एस एस ग्रुप) विजयी विरुद्ध सुपेश कामतेकर (मुंबई महानगरपालिका) 12-20, 13-12, 25-8.
18 वर्षांखालील मुले एकेरी (उपांत्यपूर्व फेरी)
सिद्धांत वाडवलकर (बँक ऑफ इंडिया) विजयी विरुद्ध ओजस जाधव (महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ) 17-11,15-8. अंकित मोहिते (विजय सी सी) विजयी विरुद्ध सुजल गायकवाड ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) 25-5,20-17 विवेक परमार (बोरीचा सी सी) विजयी विरुद्ध सूरज तांबे (महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ) 12-11,6-1, दर्शन गायकवाड (महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ) विरुद्ध गणेश साहू (महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ) 18-4,15-8.