अजबच…पुण्यात कॉंग्रेसचा उमेदवार निश्चित होण्याआधीच फुटतोय प्रचार नारळा !

0

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच मतदार संघातील उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र पुण्यात कॉंग्रेसची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. उमेदवार निश्चितीवरून पेच निर्माण झालेला असतांनाच आज कॉंग्रेसने उमेदवाराशिवाय फोडण्याची तयारी केली आहे. उमेदवार नसला तरी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढण्यात येईल, असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्पष्ट केले.

पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार शहर काँग्रेसने रविवारी सुट्टीची संधी साधून प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन केले आहे. दुपारी ४.१५ वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढली जाणार आहे. पण दुपारी अडीच वाजेपर्यंत दिल्लीतून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्याने प्रचाराचा नारळ कसा फोडायचा, असा प्रश्न कार्यकर्ते विचारू लागले आहेत.