अजमेरा कॉलनीत घरफोडी; 85 हजारांचा ऐवज लंपास

0

पिंपरी : येथील अजमेरा कॉलनीमधील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री उशीरा दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी अजित पाटील (वय 29, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित पाटील हे अजमेरा कॉलनी येथे राहतात. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पाटील यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात घुसले. चोरट्यांनी घरातील लॅपटॉप, सोन्याची चेन, मोबाईल असा एकूण 85 हजारांचा ऐवज लंपास केला. घरच्या दरवाजाचे आवाज आल्याने पाटील यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पाटील यांनी तातडीने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.