नवी दिल्ली : जयपुरच्या विशेष न्यायालयाने बुधवारी अजमेर येथील सूफी ख्वाजा मोनुद्दीन हसन चिश्ती दर्गा परिसरात सुमारे नऊ वर्षापुर्वी झालेल्या बॉम्बस्फोटातील दोन दोषींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावणली. भावेश पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) नेता देवेंद्र गुप्ता अशी त्यांची नावे आहेत.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश गुप्ता यांनी बुधवारी हा निकाल देताना मुख्य आरोपी भावेश आणि देवेंद्र यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच भावेशला दहा हजार तर देवेंद्रला पाच हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणात एकुण 14 आरोपी होते. त्यापैकी तिघे दोषी आढळले. यातील तिसरा आरोपी सुनील जोशी याचा यापुर्वीच मृत्यू झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार, स्वामी असीमानंद व साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात आरापींना यापुर्वीच दोषमुक्त केले आहे. परंतू या प्रकरणातील चार आरोपी अजूनही फरार आहेत. या फरार आरोपींवर प्रत्येकी दहा लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सुनावणी 18 मार्च रोजी होती, परंतू न्यायालयाने बुधवारपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. एनआयएच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश गुप्ता यांनी 8 मार्च रोज दोष निश्चिती सुनावताना, अजमेर येथील सू फी संत ख्वाजा मोदनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्गा परिसरात 11 ऑक्टोबर 2007 रोजी आहता ए नूर या झाडाजवळ बॉम्बस्फोट केल्या प्रकरणी आरोपी देवेंद्र गुप्ता, भावेश पटेल आणि सुनील जोशी यांना दोषी ठरवले होते. या बॉम्बस् फोटात तिघांचा मृत्यू झाला होता तर 15 लोक गंभीर जखमी झाले होते. न्यायालयाने असीमानंदसह सात आरोपींना मुक्त केले आहे. देवेंद्र गुप्ता, भावेश पटेल आणि सुनील जोशी यांना भादवि कलम 120 ब आणि कलम 295 सह स्फोटक साहित्यप्रकरणी कलम 34 आणि बेकायदेशीर कृत्यप्रकरणी दोषी ठरवले.