मुंबई : तब्बूच्या आयुष्यात आजही अविवाहित आहे. तिच्या जीवनात लाईफ पार्टनर म्हणून अजून कोणीच नाहीये. तिने बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. मात्र आजही ४७ वर्षांची तब्बू आपल्या अविवाहित असण्याला अजय देवगणला जबाबदार मानते.
तब्बूने सांगितले, की अजय आणि माझा चुलत भाऊ समीर हे चांगले मित्र होते. हे दोघेही कायम माझ्यावर नजर ठेवून असायचे आणि जेथे जाईल तेथे माझा पाठलाग करायचे. अजयमुळे मला इतर मुलांशी बोलण्याचीही भीती वाटायची. तो त्या मुलांना मारण्याची धमकी द्यायचा. ते दोघेही खूप मस्तीखोर होते. यावेळी तिने आपल्या आजही अविवाहित असण्याला अजय देवगणच जबाबदार असल्याचे तिने म्हटले होते. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जूनसोबतही तब्बूचे नाव जोडले गेले होते.