नवापूर: सामाजिक भान जपणारे अजय पदमाकर गावित यांनी एक, दोन, दहा नव्हे तर चक्क ४६ वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला आहे. रक्तदानसारखे महान कार्य ४६ वेळा करुन अजय गावित नवापूरचे रक्तकर्ण ठरले आहे. वीर महाराणा प्रताप जयंतीनिमित्त जिल्हा उपरुग्नालय नवापूर येथे रक्तदान शिबीर झाले. त्यांनी आतापर्यंत ४६ वेळा रक्तदान केले. तरुणांनी नियमित रक्तदान करावे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. या दानामुळे मानवतेचे दर्शन होते, असे त्यांनी सांगितले. लवकरच ते रक्तदानाची हाफसेंचुरी करणार आहेत. ४६ वेळा रक्तदान केल्याबद्दल दादासाहेब माणिकराव गावित पतसंस्थेतर्फे चेअरमन भरत गावित यांनी अजय गावीत यांचे या कार्याबद्दल कौतुक केले आहे. रक्तदानामुळे कोणाचे प्राण वाचतील रक्तदाना सारखे पुण्यकार्य दुसरे नाही, असा विचार अजय गावित यांनी व्यक्त केला.