ग्लासगो । भारताच्या अजय जयरामने नेदरलॅडच्या मार्क काजोचा सरळ पराभव करत जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. अन्य लढतींमध्ये भारताच्या समीर वर्मा आणि रितुपर्णा दासचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 13 वे मानाकंन मिळालेल्या जयरामने 33 मिनीटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 50 व्या क्रमांकावर असलेल्या काजोचा 21-13, 21-18 असा सहज पराभव केला. पुढच्या फेरीत अजयचा सामना दोन वेळा ही स्पर्धा जिंकणारा गतविजेता चीनचा चेन लाँगशी होणार आहे.
सय्यरद मोदी ग्रापी गोल्ड स्पर्धा जिंकणार्या समीरला 2010 मधील राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या 16 व्या मानांकित राजीव ओसेफकडून पराभव पत्करायला लागला. राष्ट्रीय विजेत्या रितुपर्णाला स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरने हरवले. रितुपर्णाने 16-21, 13-21 असा सामना गमावला. अन्य लढतींमध्ये महिला दुहेरीतील संजना संतोष आणि अराथी सारा सुनील या भारतीय जोडीचा चीनच्या 14 व्या मानांकित बाओ यिक्सिन आणि यु शियाओहान या जोडीने 21-14, 21-15 अस पराभव केला.