मुंबई : तानाजी मालुसरे यांचे नांव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. या शूर मावळ्याचे पराक्रम आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण आता तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत बॉलिवूडच्या नवाबची वर्णी लागल्याचे सांगितले जात आहे. सैफ अली खान या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत प्रेक्षकाच्या भेटीस येणार आहे. ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. या चित्रपटाचे पोस्टरही अजय देवगनने शेअर केले आहे.