अजय देवगनने काजोलचा व्हॉटसअॅप नंबर ट्विटरवर टाकला

0

मुंबई : अजय देवगनने पत्नी काजोलचा व्हॉटसअॅप नंबर थेट ट्विटरवर टाकला आहे. अजयने नंबर शेअर करण्या मागचं कारणही सांगितले आहे. यानंतर सोशल मीडियावर अजयला प्रचंड ट्रोल केले जातेय.

अजयने त्याच्या ट्विटरवर नंबर शेअर करुन लिहिले, काजोल ही भारतात नाही, तर परदेशी गेली आहे. यानंतर अनेकांनी यावर फोनही केले आहेत. तर काहींनी अभिनेत्री सनी लिओनचा नंबर टाक असेही म्हटले आहे. मात्र याचा त्याने दुसरे ट्विट करुन खुलासा केला आहे. हे केवळ एक प्रँक असल्याचे त्याने सांगितले आहे.