अजिंक्यचा मृत्यू कशामुळे?

0

नाशिक : हल्ली उत्तम शरीरयष्टीमुळे सर्वजन अवलमबताना दिसतात. दिवसरात्र आपल्या शरीराचा विचार करणारे लोक जास्तीत जास्त जिममध्ये वर्कआऊट करण्यात कार्यरत असलेले दिसतात. मात्र हा वर्कआऊट अधिक झाला तर तर तो आपल्या जीवावरही बेतू शकतो. अशीच एक घटना नाशिक येथे घडली. 19 वर्षाचा अजिंक्य लोळगे हा इंजिनिअरींगचा विद्यार्थी जिममध्ये गेला आणि भोवळ आल्याने तिथेच गतप्राण झाला. मात्र, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मोठे कोडे सर्वांनाच पडले आहे. नाशिकच्या बॉडी झोन जिममधील दृश्यं बघून अख्खा महाराष्ट्र शॉकमध्ये आहे. 19 वर्षाचा अजिंक्य लोळगे हा इंजिनिअरींगचा विद्यार्थी. शुक्रवारी सहा वाजता तो जिममध्ये गेला आणि भोवळ आल्याने तिथेच गतप्राण झाला.

अजिंक्यचं कुटुंब सिडकोच्या उपेंद्रनगर भागात राहते. वडील सरकारी नोकरीत, तर आई अंगणवाडी शिक्षिका. अजिंक्यला दोन बहिणी आहेत. वर्गात कायम पहिल्या तीनमध्ये असलेल्या अजिंक्यला खूप शिकायचे होते, पण त्यासाठी त्याला फिटसुद्धा राहायची इच्छा होती. त्यामुळे तीनच दिवसांपूर्वी त्याने जिम लावली होती.

एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बहिणींच्या डोळ्याचं पाणी ठरत नाही.
अजिंक्यचा मृत्यू कशामुळे झाला, हे वैद्यकीय तपासणीतून पुढे येईल. मात्र केवळ सिक्स पॅक अ‍ॅब्ज आणि फिटनेसच्या मागे लागून शरीर आणि मनाला ताण देणं कितपत योग्य आहे ? याचा विचार करायला हवा अवघ्या विशी-पंचविशीत ह्रदयविकारानं तरुणांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शारीरिक फिटनेससोबतच मानसिक फिटनेस कायम राहील, डाएट उत्तम राहील याचीही काळजी घ्या.