सोयगाव । जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अजिंठालेणी परीसरात खोदकामाला बंदी घाण्यात आलेली आहे. बंदी असतांना देखील स्फोटकांचा (ब्लास्टींग ) वापर करुन रस्त्याचे खोदकाम करण्याचा ‘प्रताप’ एका ठेकेदारा कडुन सुरु असुन डोंगरावर होणार्या स्फोटामुळे लेणीतील शिल्पाला मोठे हादरे बसत आहे. जागतिक वारसा असलेल्या या लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेला मोठ्या प्रमाणात हानी पोचण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसत असुन बंदी असलेल्या क्षेत्रात स्फोटकांचा वापर करणार्या या ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्याची मागणी फर्दापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप सदाशिव दामोदर यांनी लेखी निवेदनाद्वारे भारतीय पूरातत्व विभागास केली आहे. स्फोट घडवुन लेणीच्या अस्तित्वास धोका निर्माण करणार्या ठेकेदारावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजिंठालेणीच्या जतन, संवर्धन, संरक्षनाच्या दृष्टीने डोंगर रांगेत व पाच किमीच्या परीसरात कोणत्याही प्रकारच्या स्फोटकांचा वापर करण्यास पूर्ण बंदी आहे मात्र असे असतांना ही रस्त्याचे काम करणारा एक ठेकेदार सर्व नियम धाब्यावर बसवुन रात्रीच्या वेळी मोठ मोठे स्फोट घडवुन डोंगर फोडण्याचे काम करीत आहे.
रस्त्याच्या कामासाठी खोदकाम
अजिंठा लेणी पासुन दोन ते तिन किमी अंतरावर असलेल्या सावरखेडा या गावासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरु आहे या रस्त्यासाठी डोंगर फोडण्या करीता सदरील रस्त्याचे काम करणारा ठेकेदार रात्रीच्या वेळी सरार्स पणे स्फोटकांचा वापर या ठिकाणी करीत आहे. अजिंठा डोंगर रांगेत करण्यात येणार्या या स्फोटान (ब्लास्टींग) मुळे अजिंठालेणीला या डोंगर रांगेत होणार्या स्फोटांनी मोठ मोठे हादरे बसत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष
स्फोटकांच्या या हादर्यान मुळे जगप्रसिद्ध अजिंठालेणीतील पूरातन चित्रशैली व शिल्पकलेला मोठ्या प्रमाणात हाणी पोहोचुन या जागतिक वारसा असलेल्या अजिंठालेणी चे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसत आहे. अजिंठालेणी हे जगभरातील बौद्ध धर्मीयांन साठी पवित्र धार्मिक स्थळ असुन या लेणीने युनोस्को च्या यादीत स्थान मिळविलेले आहे. जागतिक वारसा असलेल्या या लेण्यांच्या जतन , संवर्धन व संरक्षणा साठी भारत सरकार जपान सरकारच्या मदतीने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करुन विविध प्रयोग करुन सतत प्रयत्न करतांना दिसत आहे.
नियमाची पायमल्ली
याच पार्श्वभूमीवर केंद्र शासन व भारतीय पूरातत्व विभागाने अजिंठालेणी परीसरात रस्त्याच्या व विहरीच्या अश्या कोणत्याही कामात स्फोटकांचा वापर करण्यास पूर्ण पणे बंदी घातलेली आहे. मात्र असे असतांना ही सावरखेडा रस्त्याचे काम करणारा एक ठेकेदार अजिंठा डोंगर फोडण्यासाठी सर्व नियमांची पायमल्ली करुन सरार्स पणे रात्रीच्या वेळी मोठ मोठे स्फोट अजिंठा डोंगर रांगेत घडवुन अजिंठालेणीतील पूरातन चित्रशैली व शिल्पकलेला मोठ्या प्रमाणात हाणी पोहोचोवतांना दिसत असुन या सर्व प्रकारा मुळे जगप्रसिद्ध अजिंठालेणीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसत आहे.