जळगाव: जळगाव महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात गुरुवार, ३० रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास महाकाय दरड कोसळली. दरडीतील मोठे दगड व माती महामार्गावर येऊन पडल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरड कोसळली त्यावेळी तेथे कोणतेही वाहन नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळापासून काही पुâटांच्या अंतरावर असलेली शिवशाही बस या अपघातातून थोडक्यात बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.