अजिंठा चौफुलीशेजारील अतिक्रमण लवकर काढणार

0

जळगाव । महामार्गावरील अंजिठा चौफुलीवर दररोज होणारी वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेवून चौफुलीच्या चारही बाजूला असलेले अतिक्रमण दोन-तीन दिवसात लवकरच काढले जाणार असल्याची माहिती प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात महत्त्वाच्या व वर्दळ जास्त ठिकाणी असलेले चौफुली ठिकाणी वाढलेले अतिक्रमण याचे मुळ कारण असल्याचे दिसून आले. त्या अंतर्गत अंजिठा चौफुली येथील अतिक्रमण बाबत आलेल्या तक्रारीवरून दोन-तीन दिवसात या चौकातील अतिक्रमण हे पोलिस बंदोबस्तात काढण्याचा सुचना प्रभारी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहे.

चौक सुशोभिकरणासाठी प्रयत्न
कारवाई करण्याची तारीख ठरवून पोलिस बंदोबस्त घेण्याचे पत्र पोलिस प्रशासन देण्याचे सुचना केल्या आहे. अंजिठा चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा गोंधळ होत असून चौकालगत बसेसे थांबत असल्याने अधिक वाहतुकीस अडचणी होत आहे. त्यामुळे चारही बाजूच्या रस्त्यालगत वाढलेले अतिक्रमण काढून वाहतुक सुरळीत करण्याचे नियोजन केले जाणार आहे. शहरात इतर ठिकाणी दिलेल्या चौक सुशोभिरणाप्रमाणे या अंजिठा चौकातील अतिक्रमण काढून हे सुशोभीकरणाला दिला जाईल. याबाबत सामाजिक संस्था अथवा संघटनेच्या माध्यमातून हा चौक सुशोभित केला जाणार असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.