राष्ट्रवादी क्राँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव याची मागणी
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल शिवसेनेचे मुखपत्र सामना या वृत्तपत्रात वादग्रस्त मजकूर प्रकाशित करण्यात आला. जनतेसमोर सत्तेला लाथ मारण्याची भाषा करणारे मात्र भाजप समोर चिडीचुप राहतात. म्हणून स्वत:चे राजकीय आयुष्य भांडणे लावण्यात खर्ची करणार्यांनी आपली पात्रता तपासावी, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
उत्तम प्रशासक, शिस्तबद्ध दैनंदिनी
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासनाला हाताळण्याचे वकुब हे अजित पवारांच्या आत्ता पर्यंतचा शैलीतून उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.बुद्धी, श्रम, कौशल्य हे ‘पंचदान’ देणारा, उदारमतवादी भुमिका असलेला सर्वसमावेशक द्रष्टा नेता आपल्या महाराष्ट्राला लाभला. शिस्तबध्द दैनंदिनी व नियोजनबध्द आखणी म्हणून अजितदादा सर्वांना परिचीत आहेत. उत्तम प्रशासक म्हणून अजित पवारांची ओळख आहे.
संजय राऊतांचे बोलणे निरर्थक
दुसरीकडे आयुष्यात एकही निवडणूक लढण्याचे धाडस नसणार्या संजय राऊत यांनी बोलणे निरर्थक आहे. गरळ ओकणार्या राऊतांना सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या पलिकडे काहीच जमलेले नाही. नेहमी भावनिकतेची साद घालून जनतेला वेठीस धरण्याचे काम आत्तापर्यंत राऊतांनी केले आहे. राष्ट्रवादीने राज्यव्यापी यात्रा काढून सरकारला जाब विचारल्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागले आहे. हे निंदनींय असून जनताच त्यांना योग्य वेळी उत्तर देईन, असे अमित बच्छाव यांनी म्हटले आहे.