अजित पवारांकडून खाड- खाड निर्णयाची अपेक्षा: चंद्रकांत पाटील

0

पुणे:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कोरोनाच्या काळात शांत कसे..? त्यांच्याकडून खाड-खाड निर्णय होणे अपेक्षित होते

असा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी

काढला आहे. कोरोनाच्या बाबतीत केंद्रसरकारने परिस्थिती अत्यंत व्यवस्थित हाताळली असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपाचे मुख्यप्रवक्ते माधव भंडारी उपस्थित होते.

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महापौर स्वतःला झोकून देत काम करत आहे असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कोरोनाच्या काळात किती गुण देणार असे विचारले असता, पाटील यांनी अशा काळात अजित पवार शांत कसे..?याचे आश्चर्य वाटते असे सांगितले.

तसेच पवार यांच्या स्वभावानुसार अशा गंभिर काळात त्यांच्यानुसार दररोज खाड-खाड निर्णय अपेक्षित होते, असे होतांना दिसत नसून ते सध्या बोलायला तयार नाही. अजित पवार सध्या का बोलत नाही हे शोधायला लागेल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.