अजित पवारांची मोठी कामगिरी: ९१६ रुग्णवाहिका भेट

0

पुणे: उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत. एखादा विषय तातडीने मार्गी लावून समस्या सोडविण्याबाबत त्यांचा नेहमी कल असतो. सर्वच क्षेत्रात त्यांची कामगिरी आहे. दरम्यान आरोग्य क्षेत्रासाठी मोठी कामगिरी त्यांनी केली आहे. पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुण्यातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना रुग्णवाहिका भेट दिली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ९१६ रुग्णवाहिका सामाजिक संस्थाना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.