अजित पवारांचे दुखणे मला माहित आहे; फडणवीसांचा चिमटा

0

पुणे: विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होईल असा दावा भाजपचे नेते करत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लक्ष केले आहे. कार्यकर्त्यांना सत्तेचे स्वप्न दाखविल्याशिवाय कार्यकर्ते थांबत नाही, त्यामुळे भाजप सतत आपली सत्ता येणार आहे, येणार आहे असे सांगत आहे. १०५ आमदार असूनही विरोधात बसावे लागे याचे दु:ख भाजप नेत्यांना आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला होता. दरम्यान याला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. “अजित पवारांचे नेमके दुखणे काय आहे? हे मला माहित आहे”, अशा शब्दात चिमटा काढला.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी फडणवीस पुण्यात होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केले.