अजित पवारांच्या वक्तव्याने राजकारणाला वळण; संजय राऊतांनी केली माफिनाम्याची मागणी !

0

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती असा कबुलीनामा दिला. त्यामुळे राजकारणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. यातच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत ‘बाळासाहेबांना अटक करणे हा कुणाचा तरी फाजिल हट्ट होता. बाळासाहेबांना अटक ही चूक होती. हे कळायला इतकी वर्ष लागली. अजित दादा तुमचे अश्रू खरे असतील तर त्या अटकेबद्दल माफी मागा’. जय महाराष्ट्र, अशा शब्दात अजित पवार यांना माफी मागण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती. राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे बाळासाहेबांच्या अटकेसाठी राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याने हट्ट धरला होता असा सवाल आता उपस्थित झाला आहे.