BREAKING: अजित पवारांच्या समर्थनातून स्थिर आणि मजबूत सरकार देणार: मुख्यमंत्री

0

मुंबई: आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच चर्चा सुरु आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल झाले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांशी यावेळी संवाद साधला.

महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवारांनी भाजपला समर्थन दिले असल्याने महाराष्ट्रात मजबूत सरकार येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आमची बांधिलकी ही महाराष्ट्राच्या जनतेशी असल्याने अजित पवारांनी मजबूत सरकार देण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी ‘फडणवीस-पवार आगे बढो’च्या घोषणाबाजी करण्यात आली. ‘मोदी है तो मुमकिन है’ अशी घोषणाबाजी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.