अजित पवारांना घरातूनच त्रास?: गिरीश महाजन

0

मुंबई: काल राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. याबाबत शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत राजकीय पातळी घसरल्याने चिंतीत असल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचे अजित पवारांनी त्यांच्या मुलांना सांगितले होत असे शरद पवार यांनी सांगितले होते. याबाबत जलसंपदा मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना त्रास देण्याचा आमच्यावर आरोप होत आहे, मात्र आम्ही हेतुपुरस्सर कोणालाही त्रास देत नसल्याचे सांगत अजित पवारांना घरातीलच त्रास आहे का? याचा मागोवा घेतला पाहिजे असा टोला लगावला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना गिरीश महाजन याबाबत विधान केले आहे.

अजित पवारांची चौकशी आघाडी सरकार असतानाच सुरु झाली असल्याचाही टोला गिरीश महाजन यांनी लगावला.