मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. अजित पवार यांच्यासोबत ११ आमदार राजभवनात गेले होते, त्यातील जवळपास ८ आमदार रात्रीच राष्ट्रवादीतच असल्याचे जाहीर करत शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले होते. मात्र ४-५ आमदार रात्री परतले नव्हते, त्यातील तीन आमदार आज पुन्हा पक्षात परतले आहे. याबाबत स्वत: आमदारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कळवणचे आमदार नितीन पवार, आमदार दौलत दरोडा, अहमदपुरचे आमदार बाळासाहेब पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी पक्षात आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे.
आमदार नितीन पवार, दौलत दरोडा हे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती, ते पुन्हा आता पक्षात आले आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शपथविधी दिली. याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले आहे. यावर आज रविवारी २४ रोजी तातडीने सुनावणी घेण्यात आली. युक्तिवाद पूर्ण झाला असून राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी केलेल्या प्रक्रियेची कागदपत्रे उद्या १०.३० वाजेपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहे.