अजित पवार-फडणवीस एकाच व्यासपीठावर; राजकीय विधान

0

पुणे: विधानसभा निवडणुकीनंतर घडलेले राजकारण संपूर्ण राज्याला ज्ञात आहे. निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर अजित पवार पुन्हा महाविकास आघाडी सरकारसोबत आले. दरम्यान त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकत्र एकाच व्यासपीठावर आले आहे. पिंपरी-चिंचवड  महापालिकेने चिंचवड येथे ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात २०० खाटांचे कोविड सेंटर उभारले.  या कोविड सेंटरचे उद्घाटन झाले त्यावेळी दोन्ही एकत्र आले. फडणवीस आणि अजित पवार एकत्र येणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी फडणवीस किंवा अजित पवार काय बोलता?याकडे लक्ष लागले होते. मात्र दोघांनी कोणतेही राजकीय वक्तव्य केले नाही.

यावेळी माजी मंत्री चंद्रकात पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.