अजित पवार ‘मुर्दाबाद’चे नारे; विधिमंडळ पक्षनेते पदावरून अजित पवारांची हकालपट्टी

0

मुंबई: राजकारणातील सर्वात अनपेक्षित घटना आज सकाळी घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही गट फुटून भाजपला पाठींबा दिल्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते होते, त्यांनी पक्षाला विश्वासात न घेता स्वत: निर्णय घेऊन भाजपला पाठींबा दिल्याने खुद्द शरद पवार नाराज झाले आहे. अजित पवारांवर पक्षाने कारवाई केली असून त्यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

खासदार सुप्रिया सुळे या देखील अजित पवारांच्या या निर्णयाने भावूक झाल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले आहे. अजित पवारांच्या निर्णयामुळे आमच्या पक्षात आणि कुटुंबात फुट पडली आहे असे status सुप्रिया सुळे यांनी ठेवले होते.

आज शनिवारी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही घटना संपूर्ण देशात खळबळ माजवणारी होती.