अजित पवार यांच्यामुळेच शहराचा कायापालट

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड अतिशय वेगात विकसित झालेले शहर आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खंबीर नेतृत्त्वामुळेच शहराचा चेहरा-मोहरा बदला आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी चिंचवड येथे केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शुक्रवारी, वैवाहिक जीवनात 50 वर्ष पूर्ण झालेल्या 55 दाम्पत्यांचा तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, कामगार आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सोलापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, नाना काटे, हनुमंत गावडे, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, नगरसेवक राजू मिसाळ, फजल शेख, अरूण बोर्‍हाडे, विजय लोखंडे, पल्लवी पांढरे, कविता खराडे, मनिषा गटकळ, प्रकाश सोमवंशी, अमोल भोईटे, गंगा धेंडे, पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, शीला भोंडवे, अरुणा कुंभार, विजया काटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साकोरे व वर्षा जगताप यांनी केले.

यांचा झाला सत्कार
अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, राजू घुले, शरीर सौष्ठव विजेता संग्राम चौगुले, पहिले ऑलिंम्पिक पदक विजेते मारुती आडकर, अ‍ॅथेलेटिक्स रुस्तम पठाण, रामदास कुदळे, संतोष माछरे, एव्हेरेस्टवीर श्रीहरी तापकीर, बॅडमिंटनपटू परब कुंभार, समीम सय्यद, शुभम शेवते, आकाश खाडे, मृण्मयी शिंडकर, भारत केसरी विजय गावडे, सांस्कृतिक विभागात डॉ. संगीता गायकवाड, लघु उद्योजक संघटनेचे शिल्पकार तात्या सपकाळ, अनिल ढोबळे, सागर साखरे, गुणवंत कामगार म्हणून विनायक मोहिते, संदीप पवार, रमेश वाघेरे तसेच, वैवाहिक जीवनात 50 वर्ष पूर्ण झालेल्या पांडुरंग-अनुराधा पिल्ले यांच्यासह 55 दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीच्या वतीने, वाहतुकीचे नियम पाळणार्‍या वाहन चालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.