बारामती । माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्या वतीने सर्व जिल्हा परिषद व नगरपालिका तसेच अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण, बारामती खरेदी-विक्री संघाचे संचालक माउली भिसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश देवकाते, पिंपरी ग्रामपंचायत सदस्य नितिन देवकाते, राजेंद्र केसकर, सुनिल बनसोडे, कालिदास खोमणे, अलका मेरगळ, मंगल खिलारे, शर्मिला चौधरी, अलका भोसले, गा्रमपंचायतीचे सहायक नाना मदने, अनिल बनकर, राजाराम थोरात, रमेश पाटील, अशोक देवकाते, महेश चौधरी, आबासाहेब देवकाते, सोमनाथ यादव, बाळासाहेब देवकाते आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. काटेवाडी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात मधुमेह, मोतीबिंदू, ताणतणाव आणि हृदयाच्या संबंधित आजारांवर उपचार करण्यात आले. यामध्ये 474 रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात मोतीबिंदू 85, हिमोग्लोबिन 434 व इतर किरकोळ आजाराचे 44 रुग्ण आढळले. ग्रामीण भागात आरोग्याबाबत जनजागृती करणे पावसाळ्यातील आजारांवर माहिती देऊन आरोग्य सुविधांचा मोफत पुरवठा करणे हा या शिबीराचा मुख्य उद्देश होता. तहसिलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, सरपंच गौरी काटे तसेच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.