मुंबई: अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले होते. मात्र आज अचानक अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. राजकारणातला हा मोठ भूकंप मानला जातो आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अजित पवार हे राजीनामा देतील हे मला अपेक्षित होते असे सांगितले आहे. अजित पवार यांच्याकडे गटनेते पद राहिले नसल्याने ते व्हीप जाहीर करू शकत नाही हे जवळपास निश्चित झाल्याने त्यांनी राजीनामा दिला असेल असेही एकनाथराव खडसे यांनी सांगितले आहे.
अजित पवार यांनी भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप मी सातत्याने केला आहे. पुरावे देखील दिले आहे, त्यांच्यासोबत भाजपने सरकार बनविल्याचे वाईट वाटले होते असे देखील खडसे यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस हे दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असून ते देखील राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे.
आज सकाळीच सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वीच मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.