राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पार पडली बैठक
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले असताना देखील पक्ष संघटना मजबूत आहे. हीच खरी कार्यकर्त्यांची ताकद आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप विरोधी वातावरण तयार झाले आहे. वारंवार फक्त आश्वासने देणार्या पक्षाला सामान्य जनता कंटाळली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी पक्षाने केलेली कामे नागरिकांना समजली पाहिजेत, असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक विजय कोलते यांनी व्यक्त केले. तळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांबरोबर झालेल्या मेळाव्यात भविष्यात येणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना विजय कोलते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
हे देखील वाचा
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन घोटकुले, दीपक हुलावळे, विजय काळोखे, सुनील दाभाडे, कृष्णा दाभोळे, जीवन गायकवाड, कैलास गायकवाड, किशोर भेगडे, अरुण माने, आनंद भेगडे, आशिष खांडगे, हेमलता काळोखे, सुनीता काळोखे, वैशाली दाभाडे, सुवर्णा राऊत, नंदकुमार कोतुळकर सह मान्यवर पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
हे काम कार्यकर्त्यांनी करायचे
विजय कोलते म्हणाले की, उमेदवाराचे काम नाही केले तर हा पडेल असे पक्ष विरोधी काम करणार्यास वाटते. त्याचा हा आत्मविश्वास संपविण्याचे काम कार्यकर्त्यांनी भविष्यात करायचे आहे. तालुक्याचे शहरी आणि ग्रामीण असे चार भाग करावयाचे, बूथ कमिट्या स्थापन करावयाच्या, प्रभाग कमिट्या स्थापन करावयाच्या आदी बाबींची चर्चा करण्यात आली. यावेळी बबनराव भेगडे यांनी निवडणूक आणि पक्ष संघटना मजबुतीसाठी करावयाची व्यूहरचना उपस्थितांना पटवून सांगितली. अभिमन्यू काळोखे, गोरख जांभूळकर, सुनील कडूसकर, नारायण ठाकर, नंदकुमार कोतुळकर, विजय काळोखे, रविंद्र पोटफोडे, सुरेश चौधरी, दीपक हुलावळे, किशोर भेगडे यांनी देखील आपले विचार मांडले. स्वागत बबनराव भेगडे यांनी केले. आभार गणेश काकडे यांनी मानले.