नवी दिल्ली- छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राम मंदिर निर्माणाचे कार्य रखडल्याचा परिणाम आहे असे विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आले आहे. भाजपाकडे अद्यापही वेळ आहे, त्यांनी चूक सुधारावी असा सल्लाही विहिपने दिला आहे.
अयोध्येत राम मंदिराचं निर्माण कार्य रखडल्यामुळे रामभक्तांनी राम मंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यात सर्वात वर असणाऱ्या पक्षाला नाकारले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे तोडगा लवकर काढावा. राम मंदिर हा मुद्दा हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्याशी जोडलेला आहे.
पाच राज्यातील निवडणूक निकाल म्हणजे काँग्रेसचा विजय नाही तर रामभक्तांचा काही काळाकरीता झालेला मोहभंग आहे असे सांगण्यात आले आहे.