मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रनावत नेहमी चर्चेत असते. सध्या ती जास्त चर्चेत राहिली ते म्हणजे चित्रपट ‘मणिकर्णिका’मुळे आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शनामुळे. आता कंगना आणखी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. कंगना के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचे समजत आहे.
कंगना यासाठी अमेरिकेतून दिग्दर्शनाचे धडेदेखील घेत असल्याचे म्हटले जात आहे. विजयेंद्र प्रसाद यांनी याआधी बाहुबली आणि मख्खीसारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे.