धुळे :जिल्हा परिषद आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना रात्री केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. याची माहिती मिळताच दलित संघटना, व समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणात जमा होत जोरदार घोषणा देत घटनेचा निषेध केला पोलीसप्रशासनाच्या वतीने महामानव यांच्या पुतळ्याची स्वच्छता करत पुष्पहार अर्पण करून सुक्षितेचा उपाय म्हणून मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काल एका अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित होण्यासाठी आलेले संभाजी बिग्रेड चे अमोल मिटकरी यांना सदर घटना कळताच त्यांनी जिल्हा परिषद आवारात येत महानवांच्या पुतळ्यास अभिवादन करून दलित मराठा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तीचा निषेध करत सबभधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. धुळे शहरात सर्वत्र शांतता असुन अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले