पुणे । पुणे रल्वे स्थानकाजवळील आरक्षण कार्यालयाजवळ शनिवारी एका अज्ञात 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी त्याचा मृत्यू कोणत्या तरी आजाराने झाल्याचा अंदाज पुणे लोहमार्ग पोलिसांनी वर्तवला आहे.
या वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही. ही व्यक्ती रंगाने काळी, बांधा सडपातळ, उंची 5 फूट 7 इंच, नाक सरळ, केस काळे पांढरे, दाढी, मिशी, डाव्या हाताच्या कोपरापासून पायापर्यंत भाजलेले व्रण, अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट त्यावर पांढरे ठिपके, व काळ्या रंगाची पॅन्ट असा त्याचा पोशाख आहे. पुढील तपास सुरू आहे.