अज्ञाताने शेतकर्‍याच्या कडब्याची गंज पेटविली

0

आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान

शिक्रापूर : येथील राऊतवाडी (ता.शिरूर) येथे महादेव भूमकर या शेतकर्‍याच्या घराशेजारील सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या कडब्याची गंज अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली असून सदर शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राऊतवाडी येथे महादेव देवराम भूमकर यांची शेती व जमीन असून त्यांच्या शेतामध्ये जनावरांचा गोठा आहे. त्यांच्या गोठयाजवळ त्यांच्या जनावरांसाठी साठविलेली सुमारे पाच हजार कडब्याची गंज आहे. आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ती गंज पेटविली त्यांनतर मोठा जाळ झाला असल्याने रात्री अडीचच्या सुमारास महादेव भूमकर हे बाहेर झोपलेले असताना त्यांना मोठ्या प्रमाणात जाळ दिसला त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला असता घरातील व शेजारील व्यक्ती बाहेर आले, त्यानी आग विजाविण्याचा प्रयत्न केल परंतु अंधार असल्यामुळे आग विजाविण्यात मोठ्या अडचणी आल्या.

घटनास्थाळाचा पंचनामा
त्यांनतर आज सकाळी घटनेची माहिती मिळताच शिक्रापूरचे तलाठी डी. एस. भराटे, माजी सरपंच रामराव सासवडे, दत्तात्रय राऊत, विलास जाधव, मंगेश राऊत, पंढरीनाथ राऊत, तानाजी बालवडे, कारभारी भूमकर यांनी त्या ठिकाणी भेट दिली असून तलाठी डी. एस. भराटे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तर नुकसानग्रस्थ शेतकर्‍याला शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल असे आश्‍वासन तलाठी भराटे यांनी दिले. सदर आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदर कडब्याची गंज पेटविली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.