अज्ञात कारच्या धडकेत इसमाचा मृत्यू

0

चाळीसगाव । धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.211 वरील मेहुणबारे गावानजीक असलेल्या गिरणा नदी पुलाच्या पुढे अज्ञात कारच्या धडकेत मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी 5 रोजी घडली. वडगाव लांबे येथील अभिजित मंगलसिंग पाटील (33) व राजेंद्र मानसिंग पाटील (52) दोघे रात्री 12 वाजेच्या सुमारास धुळे कडून वडगाव लांबेकडे होन्डाशाईन मोटारसायकल क्र.एम.एच.19 बी.व्ही.7589 वर जात असतांना हा अपघात झाला. मेहुणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार नरेंद्र सरदार करीत आहे.