अज्ञात चोरटयांचा तुरीवर डल्ला; नागरिक भयभीत

0

रावेर । अज्ञात चोरट्यांनी शेतातील तयार तुर चोरुन नेल्याची घटना लालमाती येथे घडली आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालमाती येथे भागाबाई वसंत जाधव यांचे गट नंबर 15 असलेली शेती असून शेतात तुर लागवड केली होती. शेतात सुमारे 12 हजार 250 रुपये किमतीची 250 किलो तुरीचे पाच पोतळ्या अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली. पाल आउट पोष्ट पोलिसांनी पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्याच्या मागण्या येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.