अज्ञात चोरट्यांनी घरातील दागिने पळविले

0

भोसरी : घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी पहाटे शास्त्रीचौक भोसरी येथे घडली. माणिक दामू रेटवडे (वय 55, रा. शास्त्रीचौक) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेटवडे नोकरी करतात. ते शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास नोकरीसाठी बाहेर गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून त्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 45 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. रेटवडे दुपारी दोनच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काठोरे तपास करीत आहेत.