अज्ञात चोरट्यांनी लांबविले मोबाईल

0

जळगाव। बी. जे. मार्केटमधील तिसर्‍या मजल्यावरील प्लॅट क्रमांक 10 मधून शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास चार्जिंगला लावलेले दोन मोबाइल चोरट्यांनी लांबविले आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या क्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळ्या सक्रीय झाल्या असून पोलीस तपास करीत आहेत.

घरात चार्जींगला लावला होता मोबाईल
बी. जे. मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 10 मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचे परीचर विकास प्रवीण धनगर (वय 27) आणि रुपेश प्रकाश कासार (वय 26) हे राहतात. शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास विकास याने दोघांचे मोबाइल चार्जींगला लावून पुन्हा झोपून गेला. अर्ध्यातासानंतर उठल्यावर फोन करण्यासाठी मोबाईल शोधला. मात्र दोघांचे मोबाइल जागेवर नव्हते. त्याने घरात मोबाइलचा शोध घेतला. तापमानाचा पारा वाढलेला असल्याने त्यांनी दरवाजा उघडाच ठेवला होता. त्या उघड्या दरवाजातून येऊन चोरट्यांनी मोबाइल लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी धनगर आणि कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. लवकरच मोबाईल चोरट्यांच्या बेनामी कारभाराला लगाम लावण्यात येणार आहे.