शहादा । येथील कल्पना नगर येथे अज्ञात चोरट्यानी धाडसी घरफोडी केली. यात सोन्याचे दागिने,रोख रक्कम व मोबाईल फोन असा सुमारे एक लाख 82 हजार 500 रुपयांच्या ऐवज चोरुन नेला. घटनास्थळी श्वान पथकास व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासुन लहान मोठ्या चोर्या होत असताना भर वसाहतीत धाडसी घरफोडी झाल्याने परीसरातील नागरिकामध्ये घबराट पसरली आहे.
मुख्य दरवाज्याचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश
विलास पटेल रा. कल्पना नगर हे परिवारासह सेल्वासा येथे गेले होते.त्यांचे बंद घर पाहून 24 जुनच्या रात्री ते 25 जुनच्या पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कडी कोंडा तोडून घरातील शयनगृहाचे कपाट फोडले. या कपाटातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी,4 तोळे सोन्याचे मंगळसुत्र,साडेतीन तोळे सोन्याचे गळ्यातील पेंडल,1 तोळयाचे कानातील झुमके, 15 हजार रोख रक्कम तसेच 1000 रु किमतीच्या मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाइल असा सुमारे एक लाख 82 हजार रु. किमतीच्या ऐवज चोरीला गेला.
श्वान पथकास पाचारण
दरम्यान चोरट्याच्या माग काढण्यासाठी नंदुरबार येथुन श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते मोती नावाच्या श्वानाने घराच्या आजुबाजुस फेरी मारली. मात्र रात्रभर रिमझिम पाऊस असल्याने पुढील माग काढण्यात श्वान ही अपयशी ठरला सोबतच ठसे तद्न्याना देखील पाचारण करण्यात आले होते. भर वसाहतीत घरफोडी झाल्याने नागरीकामधे घबराटीचे वातावरण पसरले आहे .
दरवाजा उघडा दिसल्यानंतर चोरी लक्षात
श्री.पाटील यांच्या घराशेजारीच त्यांचे बंधु जयेश पटेल हे रहातात. आज सकाळी ते पहाटे उठुन घराबाहेर आले असतांना त्याना विलास पाटील यांच्या घराच्या दरवाजा उघडा दिसल्यानंतर त्याना चोरी झाल्याचे लक्षात आले.याबाबत पोलीसत जयेश पटेल यांच्या फिर्यादीवर चोरट्याच्या विरोधात घरफोडीच्या गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपनिरीक्षक बी. डी .शिंदे करीत आहे.