अज्ञात महिलेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

0

सात महिन्याचे बाळ विहिरीबाहेर ठेवून घेतली उडी

पारोळा । पारोळा-चोरवड रस्त्यावर एक अज्ञात महिलेने सात महिन्याचे बाळ विहिरीबाहेर ठेवून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. श्री बालाजी नगर चोरवड रस्त्यावरील पुंजू मराठे (पहेलवान) यांच्या शेतातील परिसरात वय अंदाजे 23 वर्षीय अज्ञात महिला आपले सहा महिल्याचे बाळाला काखेत घेवून फिरत असतांना मराठे यांच्या सालदाराने बघितले. त्यानंतर त्या महिलेस विचारणा केली असता, मी देवगाची असून मी जवळील तांबे नगर येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर सालदार आपले दैनंदिन कामात मग्न होते. त्याच दरम्यान तिने तिच्या सात महिन्याच्या बाळाला विहिरीजवळ ठेवून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर विहिरीबाहेर ठेवलेले बाळ मोठ मोठ्याने रडू लागल्यानंतर सालदार विहिरीकडे आल्यानंतर त्यांनी विहिरीत पाहिले असता महिलेने आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पारोळा पोलिसांना कळविण्यात आले असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात महिलेची चौकशीचे काम पोलिस अधिकारी व कर्मचारी करित आहे.