मुंबई : बॉलीवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या दोघांनी अलिकडेच इटलीला लग्नगाठ बांधली. लग्नानंतर रणवीर ‘सिम्बा’मध्ये प्रेसक्षकांना दिसणार आहे. तोच सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, रणवीरने आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी एका अज्ञात लग्नात सरप्राईज एन्ट्री केली.
रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीर सिम्बाच्या प्रमोशनसाठी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. याच हॉटेलमध्ये एक लग्न होत होते. तिथे रणवीरने सरप्राईज एन्ट्री मारली.