अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

0

चाळीसगाव। तालुक्यातील वाघळी कडुन चाळीसगावकडे जाणार्‍या मोटार सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात एक जण ठार झाल्याची घटना घडली.

चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी येथील रहिवासी रविंद्र मधुकर गुरव वय 40 हे रविवारी 14 रोजी बजाज मोटार सायकल क्रमांक एम.एच.19 ए.3006 ने जात असतांना पातोंडा गावातील मराठी शाळे जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यु झाला. वाहन चालकाने कोणीही पहिल्या नसल्याची संधी साधुन पळ काढले. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला सुमित गुरव यांनी फिर्याद दाखल केली. अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार धर्मराज पाटील करीत आहे.