अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावचा तरुण ठार

भुसावळ/जळगाव : तालुक्यातील नशिराबादजवळील हॉटेल गारवा समोरील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावचा तरुण जागीच ठार झाला. अपघातप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गोकूळ उर्फ आण्णा सुकलाल अडकमोल (38, रा.नवनाथ नगर, वाघनगर, जळगाव,) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पायी चालवताना वाहनाने उडवले
ळगाव शहरातील वाघनगर परीसरातील नवनाथ नगरात कुटुंबासह वास्तव्यास असलेला गोकुळ हा जळगाव-भुसावळ मार्गावर खाजगी प्रवासी वाहनावर चालक म्हणून कामास होता. शुक्रवार, 18 मार्च रोजी धुलिवंदन असल्याने गोकूळ मित्रासोबत त्याच्या मूळ गावी नशिराबाद गेला होता. तेथून एकटा हॉटेल गारवा येथे आला. या ठिकाणी रात्री 11 वाजेच्या सुमारास महामार्गावर पायी चालत असतांना अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनधारक वाहनासह घटनास्थळावरुन पसार झाला. हॉटेल गारवा येथील कामगारांसह नागरीकांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंत्यविधीसह इतर कार्यक्रम आटोपल्यानंतर बुधवारख 23 मार्च रोजी या अपघातप्रकरणी मयत गोकूळ यांचा भाऊ कपील अडकमोल यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात वाहनधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.