अंजाळे गावावर शोककळा ; मित्राला मुलगी झाल्यानंतर पाहण्यासाठी जात असताना अपघात
मुक्ताईनगर– अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने एक जागीच ठार झाला तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र 46 वरील हरताळा फाट्याजवळील मारुती मंदीराजवळ शनिवारी दुपारी 2.5 वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील कर्की येथील मित्राला मुलगा झाल्याने त्या मुलाला पाहण्यासाठी यावल तालुक्यातील अंजाळे येथील सात युवक चार मोटारसायकलीवर येत असतांना हरताळा फाट्यावर हनुमान मंदिराजवळ मोटारसायकलीसमोर चालणारे डंपर अचानक थांबल्याने युवकांनी मोटार सायकली डंपरला ओव्हरटेक करून काढण्याच्या प्रयत्नात असतांना मलकापूरकडून भुसावळकडे जाणार्या अज्ञात मारुती कारने दोन मोटारसायकलीस जबर धडक दिल्याने तिघे जखमी झाले तर मुकेश गोपाळ सोनवणे (32, रा.अंजाळे, ता. यावल ) हा मोटारसायकलस्वार तरुण जागीच ठार झाला. दरम्यान अपघातग्रस्तांना उप जिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यासाठी नितीन चव्हाण, गणेश टोंगे, नितीन सनांसे, स्वप्नील श्रीखंडे आदीनी मदत केली.