जामनेर । बोदवड रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत नर जातीची निलगायीचा जागीच मृत्यु झाला. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असतांना भरधाव येणार्या वाहनाची धडक बसल्याने प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वनपाल डि.एन.रकमे, वनरक्षक टि. एन. घरजाळे, वनमजुर चरणदास चव्हाण आदी घटनास्थळी पोहोचले, पशुवैद्यकीय अधिकार्यांना बोलावून मयत निलगायचे शवविच्छेदन करण्यात आले.