अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

0

शहादा । शहादा-दोंडाईच्या रस्त्यावरील भेंडवा नाल्याजवळ अज्ञात वाहनचालकाने पादचार्‍याला धडक दिल्याने गंभीर दुखापत होऊन पालिका रूग्णालयात उपचारा दरम्यान मरण पावल्याची घटना घडली. त्याबाबत शहादा पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध 304अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मावशीला भेटण्यासाठी आल्यावर काळाचा घाला
भवनसिंग मक्कन पावरा (वय 45) रा. सिरपूर (वाडी) हा इसम आपल्या मावशीला भेटण्यासाठी शहादा येथे सोनीबाई बापू नथ्थू पावरा यांचेकडे दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आला असता त्याला भाड्यासाठी पैसे देऊन बसस्थानकावर सोडण्यात आले होते. मात्र सदर इसम शिरपूर गावाकडे न जाता दरम्यान दि.16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास भेंडवा नाल्याजवळ जखमी अवस्थेत मिळून आला.

पोलिसात गुन्हा दाखल
सदर इसमावर शहादा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान मरण पावल्याची घटना घडली असून याबाबत शहादा पोलिसात सोनीबाई बाप नथ्थू पावरा (वय 55) रा.श्रमीकनगर (शहादा) यांचे फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि 304 (अ), 679, 337, 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज सरदार करीत आहेत.