अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

0

शिक्रापूर । पिंपळे जगताप ता. शिरूर येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अंदाजे बारा वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे घडली.

पहाटेच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रस्त्याच्या कडेला एका बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसली. जखमी बिबट्या रस्त्याच्या कडेला शेतात पडून होता. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही नागरिकांनी त्याला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस नाईक संदीप जगदाळे, हेमंत इनामे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूककोंडी व नागरिकांची गर्दी आटोक्यात आणली. यावेळी सदर बिबट्या जिवंत होता. तो डरकाळ्या फोडत तेथून पळण्याचा प्रयत्न करत होता. परंतु जखमी झाल्यामुळे त्याला चालणे शक्य होत नव्हते. काही वेळाने वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक सोनल राठोड, वनपरिमंडल अधिकारी बबन गायकवाड, वनमजूर आनंदा हरगुडे, वनविभाग सर्पमित्र गणेश टिळेकर या ठिकाणी आले. परंतु जखमी बिबट्याला वेळेत उपचार मिळाले नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.